नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील अवैध्य पान टपऱ्यां विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची युवासेना आक्रमक


पनवेल दि. १७ 4k समाचार (संजय कदम ) :   गेले अनेक दिवस सातत्याने युवासेनेचा महापालिका क्षेत्रातील अवैध्य पान टपऱ्या हटवण्याच्या मुद्द्यावर महापालिकेशी पत्रव्यवहार तसेच आयुक्त, उपआयुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांशी भेटीगाठी सुरू आहेत. मात्र त्यानंतरही काही ठराविक अधिकाऱ्यांच्या टपरी मालकांशी असलेल्या लागेबंधांमुळे पनवेल महानगर पालिकेतील काही ठराविक अनाधिकृत पानटपरी हटवल्या गेल्या नाहीत. या विरोधात आता  शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची युवासेना आक्रमक झाली असून आता प्रत्यक्ष युवा सेना अश्या टपऱ्यांविरोधात धडक कारवाई करणार आहे . 


  आयुक्त मंगेश चितळे यांनी उपआयुक्त  रविकिरण घोडके यांना फोनवर स्पष्ट आदेश देऊन सुद्धा घोडके यांच्याकडून युवासेनेला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिला जात नसल्याने आज युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, युवासेना महानगर समन्वयक . जय कुष्टे आणि युवासेना उपशहर अधिकारी . दुर्गेश शुक्ला यांनी उपआयुक्त . रविकिरण घोडके यांना चांगलेच धारेवर धरत शिवसेना स्टाईल दाखवली. महापालिका आयुक्त यांनी घोडके ना युवासेनेला २ दिवसात केलेल्या कारवाईचा अहवाल देणे आणि बाकी अनधिकृत पान टपऱ्या तातडीने उचलण्याची तंबी दिलेली असतानाही घोडकेंची ही टाळाटाळ नेमकी कोणत्या उद्देशाने आहे? हा प्रश्न आज युवासेनेने विचारला..

यावर उपआयुक्त रविकिरण घोडके यांनी आजच्या आजच युवासेनेला अहवाल देण्याचे मान्य केले आणि त्याचसोबत सर्व सहआयुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांकडून तातडीने कारवाई करण्याचे मान्य केले आहे. पनवेल अतिक्रमण विभागाने या अवैध्य पान टपऱ्यांवर कारवाई करावी  अन्यथा प्रत्यक्ष युवा सेना अश्या टपऱ्यांविरोधात धडक कारवाई करेल असा इशारा या वेळी देण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top