नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

उलवे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात



 
  4k समाचार दि. 25
पनवेल (प्रतिनिधी) पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था घडवली आणि त्यांचा आदर्श घेऊन घडलेल्या वासरदारांनी ही संस्था मोठी केली असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी उलवे येथे कार्यक्रमात केले तसेच येत्या काळामध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल हे नवी मुंबईतील प्रथीतयश स्कूल म्हणून उज्वल यश संपादन करणार असा विश्वास व्यक्त करून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करायचे आहे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. 


   उलवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल सीबीएससी व मराठी माध्यम विद्यालयाच्यावतीने पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ जयंती आणि पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, प्रमुख वक्ते दिनेश सासवडे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या ज्योत्स्ना ठाकूर, सीबीएसई विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, अनंता ठाकूर, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर, धीरज ओवाळेकर, राजेश खारकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी प्रमुख वक्ते दिनेश सासवडे यांनी कर्मवीर अण्णांच्या जीवनप्रवासाचे वर्णन आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श लोकांनी घ्यावा असे प्रतिपादन करत कर्मवीरांचे खरे वारसदार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले. या सोहळ्यामध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना विविध बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top