4kNews कामोठे
मुंबई, दि. 29 (अजित मोहिते) : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने राबवलेल्या ‘सज्ज आहेत माझे हात’ या सीपीआर जनजागृती मोहिमेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. या मोहिमेदरम्यान तब्बल 61,221 नागरिकांनी सीपीआर शिकण्याची शपथ घेतली.8 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे उद्दिष्ट 50 हजार नागरिकांना सीपीआर शिकण्याची शपथ देणे आणि हृदयविषयक आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत मिळेपर्यंत सामान्य नागरिकांनी प्राथमिक मदत करण्यासाठी सज्ज राहणे, हे होते. मात्र, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिक नागरिक या उपक्रमात सहभागी झाले.

शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि सामाजिक संस्थांसह 120 हून अधिक संस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला. विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, नोकरदार, कुटुंबे आणि नागरिकांनी सीपीआरविषयी जागरूकता वाढविण्यासाठी पुढाकार घेतला.

या विक्रमाची अधिकृत नोंद झाल्यानंतर अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस लिमिटेडच्या कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. प्रीथा रेड्डी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा झाला.
डॉ. प्रीथा रेड्डी यांनी सांगितले की, नवी मुंबईतील नागरिकांनी दाखविलेला प्रतिसाद हा सामूहिक सहभागाचे उदाहरण असून, ही चळवळ देशभरातील नागरिकांना जीवन वाचविण्याचे प्राथमिक ज्ञान मिळवून देण्याच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.

अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिम विभागाचे सीईओ अरुणेश पुजेचा यांनी ही चळवळ नवी मुंबईच्या पलीकडे नेऊन देशभरातील नागरिकांना सीपीआर शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा मानस व्यक्त केला. तर आपत्कालीन विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. नितीन जगेशिया यांनी हृदयविषयक आपत्कालीन प्रसंगी वैद्यकीय मदत मिळेपर्यंतचा वेळ अत्यंत महत्त्वाचा असल्याने सामान्य नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण असणे गरजेचे असल्याचे सांगितले.

‘हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासाठी एकत्र येऊया’ या संदेशाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तत्परतेने मदत करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
Available next action: Create a downloadable PDF file here in this chat containing the finalized decisions and immediate actions दाबावे

