नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला


4kNews कामोठे दि. 29
मुंबई (प्रतिनिधी) : अजित मोहिते  : लॅब-ग्रोवन डायमंड जडित सोन्याच्या दागिन्यांची डिझाइन, निर्मिती आणि विक्री करणारी नित्याज जेम्स अँड ज्वेलरी लिमिटेडचा आयपीओ ३० सप्टेंबर २०२६ रोजी खुला होणार आहे. कंपनीने या इश्यूचा प्राइस बँड १७० ते १७५ रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित केला असून, आयपीओच्या माध्यमातून उच्च किंमतपट्ट्यानुसार सुमारे १,१०८.४२ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीचे शेअर्स एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध होणार आहेत.



या इश्यूमध्ये १५ रुपये दर्शनी मूल्याचे एकूण १,४४,५६,००० इक्विटी शेअर्स ऑफर केले जाणार आहेत. लॉट साइज २०० शेअर्सची आहे. आयपीओ ३० सप्टेंबरला खुला होऊन ५ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होईल, तर अँकर बिडिंग २९ सप्टेंबरला होणार आहे. वाटपामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ५० टक्क्यांपर्यंत, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) किमान १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (RII) किमान ३५ टक्के हिस्सा ठेवण्यात आला आहे.



आयपीओतून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा वापर प्रामुख्याने कंपनीच्या कार्यकारी भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाणार आहे. चॉइस कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर असून, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.
कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक रजनिकांत लल्लुभाई चांचड यांनी सांगितले की, आयपीओमुळे कंपनीच्या ग्राहकवर्गाचा विस्तार, डिझाइन-केंद्रित उत्पादन क्षमता मजबूत करणे आणि विविध विक्री माध्यमांमधील उपस्थिती वाढविण्यास मदत होईल.



नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचे बीटूबी उत्पादन व वितरण नेटवर्क भारतातील १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये असून, परदेशातील काही बाजारपेठांमध्येही कंपनी ग्राहकांना सेवा देते. कंपनीची उपकंपनी अयानी डायमंड्स अँड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड ऑनलाइन स्टोअरफ्रंटसह भारतातील आठ शहरांमध्ये १० फिजिकल रिटेल स्टोअर्स चालवते.



सुरत येथे कंपनीची सुमारे ७,००० चौ. फूट उत्पादन सुविधा असून, वार्षिक स्थापित उत्पादन क्षमता सुमारे ३६० किलो आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत कंपनीकडे ३२ हजारांहून अधिक दागिन्यांच्या डिझाइन्सचा पोर्टफोलिओ असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top