नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर येथे शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी सचिन मोरे यांची नियुक्ती


पनवेल, दि. 25(वार्ताहर) : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर येथील शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदी सचिन कृष्णाजीराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र प्रदान समारंभ शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, टाटा मेमोरियल हॉस्पिटल युनियनचे अध्यक्ष दिनेश चावरा, तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेचे प्रदेश सचिव अमित राजेंद्र भटनागर यांनी नियुक्तीपत्राद्वारे सचिन मोरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. नियुक्तीपत्रात कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य करणे, संघटना अधिक मजबूत करणे तसेच शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे विचार प्रभावीपणे कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


यावेळी नवनियुक्त कार्याध्यक्ष सचिन मोरे यांनी वरिष्ठ नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कामगारांवरील अन्यायाविरुद्ध ठामपणे लढा देत त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट करून टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या नियुक्तीमुळे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर येथील कामगारांच्या विविध प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा कामगार वर्गातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top