नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोफत मल्टी स्पेशालिटी महाआरोग्य शिबिर

4kNews कामोठे
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः   स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मेडिकव्हर हॉस्पिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २६ जुलै २०२६ रोजी मोफत मल्टी स्पेशालिटी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 


हे शिबिर रेल विहार सोसायटी, कम्युनिटी हॉल, सेक्टर-४, खारघर, नवी मुंबई येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


शिबिरात नागरिकांसाठी शरीर वस्तुमान निर्देशांक (बीएमआय), रक्तातील ऑक्सिजनची पातळी (एसपीओ₂), रक्तदाब, रक्तातील साखर आणि ईसीजी या तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. तसेच अस्थिरोग तज्ज्ञ, छातीरोग तज्ज्ञ, सामान्य वैद्यकीय तज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांचे मोफत मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या जनहिताच्या उपक्रमाचे आयोजन शैलेश शिंदे (पनवेल शहर जिल्हा सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस), रोशन पवार (पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) आणि रुपेश पाटील (कोकण प्रदेश संघटक, पनवेल विधानसभा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी केले आहे.
आयोजकांनी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top