नवीन बातम्या
ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्ह्यात संघटनात्मक नियुक्त्या
नैना प्रकल्पग्रस्तांचा १३ वर्षांचा संघर्ष; शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; प्रलंबित प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन
जय माताजी महिला भजन मंडळाकडून गो-रक्षण संस्थेला ५५ हजारांची देणगी
राहुल शिवाजी बनसोडे यांचा ‘बनसोडे एंटरप्रायजेस’च्या माध्यमातून बौद्ध वस्तूंचा व्यवसाय
बुद्धमूर्तींपासून धम्मसाहित्यापर्यंत विविध वस्तू उपलब्ध; सांगली आणि नवी मुंबईत व्यवसायाचा विस्तार
पनवेलमध्ये राज्यस्तरीय जलसा गीत गायन स्पर्धा; सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा सह्याद्री संस्थेतर्फे आतिष साळवी  आणी नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते  श्री. राहुल शिवाजी बनसोडे यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव
‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते राहुल शिवाजी बनसोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान
नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; भूमिपुत्रांना प्राधान्य!
राष्ट्र प्रथम’ विचार सर्वदूर पोहोचविण्याची गरज
महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन; ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा


4kNews कामोठे

उरण दि 26.(विठ्ठल ममताबादे ) भाविक भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या भारतातील महान संत साईबाबा यांना मानणारा वर्ग उरण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असून उरण मध्ये अनेक साई मंदिरे आहेत तिथे नियमितपणे नित्य नियमाने दररोज पूजा आरती भजन केले जाते.अनेक वर्षांपासून साईभक्तांतर्फे तसेच विविध मंडळा तर्फे उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजनही केले जाते. अशाच मंडळापैकी ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळ उरण हे मंडळ एक आदर्श मंडळ असून ट्रस्टी जनार्दन घरत हे गेली पंचवीस वर्षे अखंडपणे नित्यनेमाने  श्री साई मंदिर अंबिकावाडी उरण ते शिर्डी अशी पदयात्रा काढतात.




यंदाचे पदयात्राचे सव्वीसावे वर्ष आहे. या मंडळातर्फे रविवार २५/१०/२०२६ ते सोमवार ०२/११/२०२६ या कालावधीत उरण ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मंडळाचे पदाधिकारी सदस्य, साईभक्त उरण मधून शिर्डी कडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. साईबाबाचे  नामस्मरण करत भक्तीगीत गात हे पदयात्री ०२/११/२०२६ रोजी शिर्डीत पोहोचणार आहेत. गुरुवार दिनांक ०७/११/२०२६ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत श्री साई मंदिर, अंबिकावाडी नागाव उरण येथे श्री साई भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४ वाजता श्रीच्या चरण पादुका, पालखी पूजन, काकड आरती, पुढील प्रस्थान, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती व श्री साई चरित्र अध्याय पारायण, दुपारी ३ वाजता ॐ श्री साईनाथाय नमः मंत्राचा जप व पुढील प्रस्थान, सायंकाळी ६:३० वाजता धूप आरती, ६:३० ते ८ भजन कीर्तन भारूड प्रवचन असा पदयात्रेतील दैनंदिन कार्यक्रम आहे.

सदर पदयात्रा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष- संदीप ठाकूर नागाव, उपाध्यक्ष-  लक्ष्मीकांत पाटील नागाव, सचिव विजय घरत अंबिकावाडी, उपसचिव गणेश पाटील उरण कोटनाका, खजिनदार हिम्मत पाटील केगाव दांडा, पालखी प्रमुख उमेश भोईर कोटनाका,खानपान निशा शांताराम घरत,  शांताताई संजय भोईर-न्हावा, महिला हरिपाठ मंडळ – प्रमिला घरत – अंबिकावाडी,नयना नाईक – टाकिगाव, निराबाई घरत – अंबिकावाडी, सल्लागार जनार्दन घरत – अंबिकावाडी, बळीराम गायकवाड, हरिभाऊ नाईक- टाकीगांव तसेच सर्व पदयात्री, कारसेवक साई भक्त विशेष मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top