पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः रेल्वेने प्रवास करणार्या महिलेची लॅपटॉप बॅग रेल्वेत विसरली असता अज्ञाताने ती चोरी केल्याची घटना घडली आहे.

पनवेल परिसरात राहणार्या अंकिता सावरटकर यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेमध्ये वारंवार होणार्या चोर्यांना आळा घालण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.
