नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’


4 k सामाचार
पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक २३ ऑगस्ट आणि रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 


 शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणारी हि स्पर्धा ‘पुरुष खुला गट’ आणि ‘महिला खुला गट’ अशा दोन गटात होणार असून प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकास १५ हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक ७ हजार रुपये, तसेच उत्कृष्ट पखवाज वादक व उत्कृष्ट तबला वादक यांना प्रत्येकी ७ हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. 


  या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता व अधिक माहितीसाठी सागर राजे – ९२२४३४४१३६, नारायण बुवा पाटील- ७७१५८३५४२४,  उमेश बुवा चौधरी – ९३२४८२४२०५, चंद्रकांत मने ९७६८६५६४८४, विनोद तोडेकर ७०४५८२२५४८, जगदीश म्हात्रे – ९३२६८१२१९६, पुनमताई ठाकूर ७२०८७७६००५, अभिषेक पटवर्धन – ९०२९५८०३४३, पवन राजे – ९२२१०९७३३७, अनिल कोळी – ९१६७४७४५०७, मच्छिंद्र पाटील – ९००४०४८६३०  किंवा डॉ. शैलेश वाजेकर ९८६७२९६८५० यांच्याशी संपर्क साधावा तसेच रायगडमधील सर्व भजनी मंडळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top