नवीन बातम्या
तळोजा एमआयडीसीतील खाद्य कंपन्यांना बेकायदेशीर नोटिसा?  दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची शिवसेना पनवेल महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश सोमण यांची मागणी
संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीवरील कथित अवैध उत्खनन थांबवा : मधुसूदन पाटील भामचंद्र-भंडारा डोंगराच्या संरक्षणाची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाचे राज्यव्यापी आंदोलन; ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे निर्णय मागे घेण्यासह केजी ते पीजी मोफत व समान शिक्षणाची मागणी
संस्कृतीर दिशारीतर्फे ‘मैफिल-ए-अनुराग’चे आयोजन
शास्त्रीय गायन, वादन आणि कथक नृत्याची रंगणार सुरेल मैफल
न्यायदानाची प्रक्रिया केवळ कागदी नसून नैतिक मूल्यांवर आधारित:- माजी न्यायमूर्ती अभय ओक
कामोठ्यातील ‘एल. के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा
महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम व स्वीकृत नगरसेवक परेश ठाकूर यांची आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे मागणी
पॅडेलमधील अव्वल खेळाडू आर्टुरो कोएलो, ऑगस्टिन तापिया यांची पनवेलमध्ये भेट. गोदरेज सिटीमध्ये भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन
मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या ठाणे-नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

न्यायदानाची प्रक्रिया केवळ कागदी नसून नैतिक मूल्यांवर आधारित:- माजी न्यायमूर्ती अभय ओक


4kNews कामोठे
पनवेल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व बार असोसिएशनतर्फे विशेष व्याख्यान आणि मुलाखत कार्यक्रम संपन्न
पनवेल दि १ . प्रतिनिधी
“न्यायाधीश आणि वकील या दोघांनीही न्यायालयाचे पावित्र्य जपले पाहिजे.  बदलत्या सामाजिक व व्यावसायिक परिस्थितीत दोघांनीही आपापल्या नैतिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत. न्यायदानाची प्रक्रिया ही केवळ कागदी प्रक्रिया नसून ती नैतिक मूल्यांवर आधारित पवित्र धोरण आहे,” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांनी केले.


३० ऑगस्ट २०२६ रोजी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग, तालुका विधी सेवा समिती पनवेल आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान व मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास बी. अग्रवाल यांनी भूषवले. यावेळी जिल्हा न्यायाधीश विमलनाथ सा. तिवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती म. कांटे, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रत्नदीप राम पाटील आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रत्नदीप पाटील आणि कायदेतज्ज्ञ शैलेश कोंडसकर यांनी माजी न्यायमूर्ती ओक यांची मुलाखत घेतली.
वकील आणि   न्यायाधीश यांच्यातील सलोख्याबाबत बोलताना न्यायमूर्ती ओक म्हणाले, “वकिलांनी न्यायालयाचे पावित्र्य राखून अचूक व अभ्यासपूर्ण युक्तिवाद करावा, तर न्यायाधीशांनी प्रत्येक प्रकरणात निष्पक्ष आणि संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा. बार आणि बेंचमध्ये पारदर्शक संवाद व परस्पर आदर असल्यास सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो.”
या मुलाखतीत न्यायमूर्ती ओक यांनी


वकिली व्यवसायातील आव्हाने, नवोदित वकिलांच्या सुरुवातीच्या काळातील अडचणी आणि शिष्टाचार. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना असलेल्या मर्यादा, प्रादेशिक भाषेत न्याय मिळण्याचे महत्त्व आणि न्याय प्रक्रियेतील विलंबाची कारणे, वकील संघटनांमधील वाढता राजकीय हस्तक्षेप आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या.  नैतिक जबाबदाऱ्याच नव्हे, तर इतरही अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल संवाद साधण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने वकिली व्यवसायाची सुरुवात व आव्हाने, न्यायालयांचे शिष्टाचार (Decorum), अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आंदोलनांच्या मर्यादा, स्थानिक भाषेतून न्याय मिळण्याचे महत्त्व, न्याय प्रक्रियेतील विलंबाची कारणे आणि पनवेलमधील सद्यस्थिती, वकील संघटनांमधील राजकीय हस्तक्षेप व प्रदूषण, तसेच आजच्या तरुण पिढीला (Gen-Z) दिला जाणारा घटनात्मक रोडमॅप  या सर्व मुद्द्यांवर माजी न्यायमूर्तींनी आपली मार्गदर्शक मते मांडली.  

या विशेष कार्यक्रमाला पनवेल परिसरातील आदरणीय न्यायमूर्तीगण, वरिष्ठ व कनिष्ठ वकील तसेच कायदे अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन उत्साही वातावरणात पार पडले.
आजच्या तरुण पिढीसाठी घटनात्मक रोडमॅप अशा विविध विषयांवर परखड मते मांडली.
या सोहळ्यास पनवेल परिसरातील न्यायाधीश, ज्येष्ठ व कनिष्ठ वकील तसेच विधी क्षेत्रातील अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट रत्नदीप पाटील, सचिव अ‍ॅडव्होकेट प्रल्हाद खोपकर, उपाध्यक्ष अ‍ॅडव्होकेट सचिन म्हात्रे, सहसचिव अ‍ॅडव्होकेट दिपाली गावंड, खजिनदार अ‍ॅडव्होकेट धनराज तोकडे, सहखजिनदार अ‍ॅडव्होकेट विशाल डोंगरे, ऑडिटर अ‍ॅडव्होकेट भुषण म्हात्रे, सदस्य अ‍ॅडव्होकेट विजयेंद्र मुंढे, सदस्य अ‍ॅडव्होकेट इरशाद शेख, सदस्य अ‍ॅडव्होकेट ज्योती उरणकर, सदस्य अ‍ॅडव्होकेट छाया म्हात्रे, अ‍ॅडव्होकेट प्रज्ञा भगत आणि अ‍ॅडव्होकेट शैलेश कोंडसकर यांच्यासह या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गठित करण्यात आलेल्‍या विविध समित्‍या व संपूर्ण  कार्यकारिणीने सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top