नवीन बातम्या
पॅडेलमधील अव्वल खेळाडू आर्टुरो कोएलो, ऑगस्टिन तापिया यांची पनवेलमध्ये भेट. गोदरेज सिटीमध्ये भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन
मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या ठाणे-नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
४८ लाखांच्या हायवा डंपरचा अपहार; एकावर गुन्हा दाखल
नवीन पनवेलमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराला ४०० नागरिकांचा प्रतिसाद
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार
पनवेलमध्ये डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका; स्वाईन फ्लूबाबतही चिंता शिवसेना शिष्टमंडळाचे आरोग्य विभागाला १५ सप्टेंबरपर्यंत उपाययोजनांचे अल्टिमेटम
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलच का लक्ष्य?
परिमंडळ १ व २ मधील बारच्या वेळांवरही प्रश्नचिन्ह; केवळ पनवेलचे नाव चर्चेत आणण्यामागे ‘बोलविता धनी’ कोण?
केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ;
१०० गरजू कुटुंबांना रेशन, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; २०० महिलांना साड्यांचे वाटप

महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


4kNews कामोठे
नवी मुंबई, दि.१ (वार्ताहर) : महामार्गालगतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ५० आरएसपी विद्यार्थ्यांनी वाहतूक व्यवस्थापनात सहभाग घेतला. 



तळोजा वाहतूक शाखेच्या वतीने एनएच-४८ महामार्गालगत शाळेसमोर हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सिग्नलचे महत्त्व, सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे तसेच पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांसोबत महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करून शाळकरी मुलांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडून देण्याचे प्रात्यक्षिक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची प्रत्यक्ष माहिती मिळून रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती झाली. पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी व तळोजा वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी उपक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top