उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. काही वेळा पूर्वी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकमताने अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.

विधानसभेमध्ये देखील बहुमत सिद्ध करण्यासाठी बहुमत चाचणी होईल. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना महत्त्व प्राप्त होतंय. काल निकाल लागला आणि महायुतीला भरघोस असं यश मिळालेलं आहे.
