4k समाचार
पनवेल, दि.27 (संजय कदम) ः केलेला नवस पूर्ण झाल्याने त्याची उतराई म्हणून अॅड.कोमल मोहनीश भोईर आणि उद्योजक मोहनीश अनंत भोईर यांनी शिवनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणपती बाप्पाची मुर्तीची भेट देवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवस फेडला आहे.

शिवनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंधेरी (प.) येथील गणरायाकडे भोईर कुटुंबियांनी नवस बोलला होता. त्या नवसाची पूर्तता झाल्याने यंदाच्या वर्षी या मंडळाची मुर्ती भोईर कुटुंबियांच्यामार्फत देण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक राजू नेटके, अध्यक्ष विवेक घाडी, कार्याध्यक्ष प्रतिक मालाडकर, सचिव गुरुसनाथ शेट्टी, खजिनदार हरिष एडला, उपसचिव अक्षय सुर्वे व शशांक काकडे, उपाध्यक्ष विशाल पवार व अरुण कदम, उपखजिनदार रोहित कालप, रितेश शेलार यांनी या मुर्तीची थाटामाटात आगमन करून भोईर कुटुंबियांचे आभार मानले आहेत.
