पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळाचा वार्षिक शैक्षणिक महोत्सव कॉमर्शिया‘Commercia’२०२४-२५’ दिनांक २७ व २८जानेवारीला उत्साहात साजरा झाला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के. पाटील यांची उपस्थिती लाभली. वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रो.डॉ.एस.बी.यादव, व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ.अजय दीक्षित, लेखा व वित्त विभाग प्रमुख डॉ. निलेश कोळी, व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा.कुशलकुमार कुराणी आणि वाणिज्य मंडळाच्या प्रमुख डॉ.कीर्ती वर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उदघाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के.पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअर वृद्धीसाठी या सुविधांचा उपयोग करण्यास सांगितले. तसेच वाणिज्य शाखेचे प्रमुख एस.बी.यादव यांनी यावर्षीचा शैक्षणिक महोत्सव कॉमर्शिया २०२४-२०२५ बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वार्षिक महोत्सवात ब्रांड लोगो डिझाईन, ब्रेन विझार्ड कॉम्पिटिशन, बिझनेस प्लान कॉम्पिटिशन टाईप ओ मास्टर, बिंदास बोल कॉम्पिटिशन, वॉर ऑफ थॉट, आणि कौन बनेगा सेल्स चॅम्पियन इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भरघोस प्रतिसाद नोंदविला.

त्याचप्रमाणे, यावर्षी नव्याने सुरु केलेला ‘बेस्ट स्टुडन्ट पार्टिसिपेशन वॉर्ड ऑफ कॉमर्शिया २०२४-२५’ टी.वाय.बी.एम.एस.ची विद्यार्थिनी ज्योती चौहान हिने पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका दुबे या विद्यार्थिनीने केले. तसेच ज्योती फडतरे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
