नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

सायबर  गुन्ह्यातील आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी केली अटक

4kNews
पनवेल दि.13 (संजय कदम): पनवेल शहर पोलीस स्टेशन सायबर पथकाने सायबर गुन्ह्यात ५ लाख १४ हजार ५००  रुपयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
    फिर्यादी संतोष अस्वले यांनी टाटा स्टीलची खरेदी करण्याकरीता गुगल वर नंबर शोधून आरोपी यास ऑर्डर देऊन त्यांना आरोपी याने खोटे इन्व्हाईस पाठवून त्यांची एकूण 5,14,500/_ इतके रुपयाची फसवणूक केली होती. नमूद गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून टाटा स्टील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट या कंपनीचा नावाने मोबाईल क्रमांक google ads मध्ये अपलोड केलेला आरोपी सूर्यांश सहज सिंह (वय 22 वर्षे, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याचे लोकेशन सुलतानपूर उत्तर प्रदेश येथे होते. त्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यातील वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली पो उप निरी. अभय कदम, पोहवा थवई, पो.शि. गायकवाड, पो.शि. मेरया, पो.शि. पालवे, पो.ना. प्रवीण पाटील हे सायबर पथक सुलतानपूर, उत्तर प्रदेश येथे रवाना झाले. पथक सुलतानपूर, उत्तर प्रदेश येथे पोहोचल्यावर नमूद आरोपी हा नैनीताल, उत्तराखंड येथे जात असल्याचे लोकेशन द्वारे समजले

. तरी सायबर पथक तात्काळ रात्रीचा प्रवास करून सुलतानपूर ते नैनिताल असे 500 कि.मी. प्रवास करून भीमताल पोलीस ठाणे, नैनिताल येथे पोहोचले. नैनिताल येथील पोलिस अमलदार जितू ठाकूर यांच्या मदतीने आरोपी सूर्यांश सहज सिंह (वय 22 वर्षे, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) यास भिमताल पोलीस ठाणे हद्दीत आरोपी मिळून आल्याने त्याचा ताबा घेतला. त्याच्या ताब्यात मोबाईल डिव्हाईस व लॅपटॉप मिळून आला. सदर आरोपी हा गुगल ऍड्स व वेबसाईट तयार केल्याचे त्याच्या लॅपटॉप व मोबाईल मध्ये मिळून आले आहे. तसेच मुख्य आरोपी सोबत चॅट मिळून आले आहेत. सदर आरोपी विरोधात पुरेसे तांत्रिक पुरावे प्राप्त झाले असून त्यास अटक करून मा. न्यायालय, नैनिताल, उत्तराखंड यांच्यासमक्ष हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली. पुढील तपास पो उप निरी. अभय कदम,करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top