4k समाचार
नवी मुंबईतील मतदारयादीवर मोठा विसंवाद उघडकीस आला आहे. तब्बल ७६ हजार दुबार नावे या यादीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१,५५६ तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात सुमारे ३५,००० अशी मोठी संख्या आहे.

या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून ही सर्व दुबार नावे तात्काळ वगळण्याची मागणी केली आहे.

मतदारयादीतील या त्रुटींमुळे आगामी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
