नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

पनवेलमधील सिद्धी विश्वास देशमुख करणार  ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन इलेव्हन’ मध्ये परफॉर्म

4kNews
पनवेल दि.०7(वार्ताहर) : पनवेल शहरातील  सिद्धी विश्वास देशमुख हिने तिच्या कलेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित रिअॅलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट – सीझन इलेव्हन’ यामध्ये परफॉर्म करणार आहे. द्रोण आर्चरी अकादमीच्या तिच्या सहकाऱ्यांसह सिद्धीने दिलेला थरारक आणि अद्वितीय परफॉर्मन्स आता संपूर्ण देश पाहणार असून, याचा प्रत्येक पनवेलकराला अभिमान वाटत आहे. 


  द्रोण आर्चरी अकादमीची टीम देशातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्तुंग कामगिरी करत आली असून, त्यांच्या अभिनव शैलीतील ‘आर्चरी परफॉर्मन्स आर्ट’ ने देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या टीममध्ये सिद्धीचे योगदान विशेष उल्लेखनीय असून, तिच्या नेमबाजीतील अचूकता, आत्मविश्वास व मंचावरील उपस्थिती खरोखर प्रेरणादायी आहे. इंडियाज गॉट टॅलेंटच्या परीक्षकांनी देखील त्यांच्या परफॉर्मन्सची दाद देत त्यांचे कौतुक केले आहे. पनवेलच्या मातीतून उगवलेल्या या लहानग्या कलाकाराने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेली ही संधी केवळ तिच्यासाठीच नाही, तर पनवेल शहरासाठीही मोठा सन्मान आहे. 

सिद्धीच्या यशामागे तिच्या पालकांचे, प्रशिक्षकांचे आणि संपूर्ण अकादमीचे कठोर परिश्रम व सातत्यपूर्ण मार्गदर्शन आहे. या शनिवार आणि रविवारी रात्री ९:३० वाजता, सोनी टीव्ही आणि Sony LIV App वर सिद्धी आणि तिच्या टीमचा परफॉर्मन्स प्रसारित केला जाणार आहे. शहरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमी यांनी सिद्धीला भरभरून शुभेच्छा दिल्या असून, सर्वांनी हा अप्रतिम प्रदर्शनाचा क्षण नक्की पाहावा, असे पालकांनकडून आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top