नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात पनवेल शहर पोलिसांची कारवाई

4kNews
पनवेल दि. १० ( संजय कदम ): शहरातील वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात आज पनवेल  शहर पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे .  


वडाळे  तलावासह व्हि. के . हायस्कुल परिसरात  अनेक तरुण दुचाकी ,चार चाकी वाहने घेऊन हुल्लडबाजी करित असतात . याचा नाहक त्रास या भागातील शालेय विद्यार्थांसह परिसरातील नागरिकांना होत होता . याबाबत अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना यांनी केल्या होत्या . या तक्रारीच्या आधारे आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पो.नि. अभंग व विशेष पथकाने आज या भागात धडक कारवाई करत ल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना चांगलाच धडा शिकविला  . त्यामुळे त्यांची चांगलीच पळती भुई झाली . या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या पुढे सुद्धा अश्या प्रकारे कारवाई सुरूच ठेवण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top