नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

आईच्या किडनीमुळे मुलाला नवजीवन



4kNews दि. 10
महाड, l:मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला त्याच्या आईने किडनी दान करून नवजीवन दिले आहे. मेडिकव्हर हॉस्पिटल नवी मुंबई येथे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. रुग्णाला अॅटिपिकल हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम (Atypical HUS) हा दुर्मिळ आजार झाला होता. डॉ. अमर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्रगत उपचारांच्या मदतीने रुग्णाचा जीव वाचविण्यात यश आले.



महाड तालुक्यातील बिरवाडी येथील सूरज पवार यांना २०२४ मध्ये IG-A Nephropathy चा त्रास सुरू झाला होता. स्थिती बिघडत गेल्याने शेवटी मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरला. आपल्या मुलाचे प्राण वाचावेत यासाठी त्यांची आई पुढाकार घेऊन किडनी दान करण्यासाठी पुढे आली.
यशस्वी प्रत्यारोपणानंतर सध्या आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती उत्तम असून तब्येत सुधारत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. 

नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमर कुलकर्णी म्हणाले की, “आधुनिक उपचार पद्धती, सातत्यपूर्ण देखरेख आणि योग्य औषधोपचारांमुळे सूरज पूर्णपणे बरा झाला आहे. प्रत्यारोपणानंतर एका वर्षाने तो पुन्हा दैनंदिन कामे, नोकरी व व्यवसाय व्यवस्थित सुरू करू लागला आहे. आईची तब्येत देखील पूर्णपणे ठणठणीत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top