नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

दि.बा. पाटील यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाची मागणी..

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेकडून सिडको व पोलिसांना निवेदन, २६ सप्टेंबरला धरणे आंदोलन.

पनवेल (4K News) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला काहीच दिवस शिल्लक असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या दैवत मानल्या जाणाऱ्या स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था रस्त्यावर उतरणार आहे.



संस्थेच्यावतीने सोमवारी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि बेलापूर सीबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना २६ सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांना निवेदन देण्यात आले.



रायगड व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी विकासाच्या दृष्टीने आपली जमीन विमानतळासाठी दिली. त्यांच्या या त्यागाचा सन्मान म्हणूनच विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी संस्थेने केली आहे. राज्य सरकारने देखील मंत्रिमंडळाचा ठराव पारित करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असून, तरीही केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी आहे.



या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्था २६ सप्टेंबरला एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, विवेक पाटील, संजय कदम, केवल महाडिक, राज भंडारी, विशाल सावंत, सनीप कलोते, लालचंद यादव, आण्णासाहेब आहेर, चंद्रकांत शिर्के, तसेच महिला पदाधिकारी रुपाली शिंदे आणि दीपाली पारसकर आदी उपस्थित होते.


या वेळेस पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे  सदस्य गौरव जहागीरदार, सुनील पाटील, शैलेश चव्हाण, सुनील वारगडा, अनिल कुरघुडे, सुनील भगत आणि  इतर  सदस्य काही कारणामुळे आज उपस्थित राहू   शकले नाही म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली पण  ते 26 तारखेच्या धरणे आंदोलनाला नक्कीच उपस्थित राहतील असे  त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top