4k समाचार
लातूर, दि. __12_ – मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, याचा परिणाम म्हणून एका तरुणाने जीवन संपवले. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याच्या वांगदरी गावातील भरत कराड याने मांजरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली सुसाईट नोट पोलिसांना सापडली आहे.

या नोटमध्ये “मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसी आरक्षण कायमस्वरूपी संपवले आहे. सरकारने ओबीसी समाजाचा घात करुन ओबीसीविरुद्ध जीआर काढला,” असे स्पष्ट उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे ओबीसी समाजात संतापाची लाट पसरली असून, सरकार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात नाराजी वाढत आहे. आरक्षणावरून समाजातील अस्वस्थता आणि आत्महत्येप्रकरणी न्यायाची मागणी जोर धरत आहे.
ही घटना ओबीसी समाजासाठी धक्कादायक असून, राज्यभर यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
