4k समाचार दि. 13
पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या गावांना आता त्यांची जुनी ओळख परत मिळाली आहे. सिडकोने या गावांना आर-१, आर-२, आर-३, अशी नवीन नावे दिली होती, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जात होती. यामुळे, गावातील रहिवाशांनी आपली जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि या प्रयत्नांना आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले आणि अखेरीस सिडकोने गावांना त्यांची जुनी नावे परत देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघीवली वाडा, वरचे ओवळे, कोंबडभूजे, तरघर, गणेशपुरी आणि उलवे ही गावे विस्थापित झाली, पण त्यांच्या खरी ओळख जपण्याऐवजी सिडकोने त्यांना आर-१, आर-२, आर-३, आर-४, आर-५ अशी नवीन नावे दिली आणि गावांचा इतिहास व संस्कृती पुसून टाकली. या गावांना त्यांची जुनी ओळख कायम राहावी यासाठी दहा गाव समिती आणि ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. त्याला आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ देऊन सिडकोने आता या गावांना जुनी ओळख कायम केली आहे.

त्यानुसार आता जुन्या नावाची ओळख गावांना परत मिळाली असून सेक्टर आर-१ हे ‘चिंचपाडा सेक्टर आर १’, सेक्टर आर-२ हे ‘चिंचपाडा सेक्टर आर २’, सेक्टर आर-३ हे ‘चिंचपाडा व कोल्ही सेक्टर आर ३’, सेक्टर आर-४ हे ‘कोपर सेक्टर आर ४’, सेक्टर आर-५ हे ‘वाघिवलीवाडा सेक्टर आर ५’, सेक्टर १ हे ‘वरचे ओवळे सेक्टर १’, सेक्टर २४ हे ‘उलवे सेक्टर २४’, सेक्टर २५ हे ‘तरघर व कोंबडभुजे सेक्टर २५’, सेक्टर २५ ए हे ‘कोंबडभुजे व गणेशपुरी सेक्टर २५’, सेक्टर २६ हे वाघिवली सेक्टर २६, तर सेक्टर १३ हे ‘डुंगी सेक्टर ३’ या नावाने अर्थात जुन्या नावाने ओळखले जाणार आहे.

सिडकोने पनवेल परिसरात होणाऱ्या विमानतळाच्या बांधणीसाठी चिंचपाडा, कोल्ही कोपर, पारगाव, ओवळे, कोंबडभुजे, उलवेसारख्या भागातील जमिनी संपादित केल्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला म्हणून २२.५ टक्के प्रमाणे भूखंड देण्यात आले. नवी मुंबई विमानतळ उभारताना जी गावे विस्थापित आली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन तेथे इमारती उभ्या राहिल्या. गावाचे गावपण जाते की काय असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडू लागला. भूखंडावर इमारती उभ्या राहिल्या. भूखंड सिडकोचे असल्याने त्यांना नावेही सिडकोने दिली. मात्र गावांची ओळख कायम रहावी यासाठी सिडकोकडे मागणी करण्यात आली आणि त्या मागणीला आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठबळ दिले. या संदर्भात सिडकोने महत्वपूर्ण निर्णय घेत गावांना आता त्यांची जुनी ओळख कायम ठेवली आहे.
