नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

वीरशैव-लिंगायत महामेळाव्यात प्रा. मनोहरजी धोंडे यांची ठाम भूमिका.
जनगणनेत वीरशैव-लिंगायत  म्हणून नोंद करण्याचे

4k समाचार
उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )
कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत एकता संमेलनात शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी येणाऱ्या जनगणनेत सात नंबरच्या रकान्यात आपला धर्म ” वीरशैव – लिंगायत धर्म ” अशी नोंद करून जातीच्या रकान्यात आप – आपली जात लिंगायत शब्द जोडून ( उदा : लिंगायत वाणी , लिंगायत तेली , लिंगायत जंगम असे )  लिहावे असे आवाहन केले. या व्यासपीठावर केदार जगद्गुरु यांना सोडून पंचपीठाचे  उर्वरित चारही जगद्गुरु आणि शिवगंगा मठासह विरक्त मठाचे जगद्गुरु आणि सुमारे १२०० मठाधिपती उपस्थित होते.  तसेच व्यासपीठावर प्रा. मनोहर धोंडे यांच्यासहित कर्नाटक राज्याचे भाजपचे माजी मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई , माजी उपमुख्यमंत्री राजशेखर शेट्टर , वन मंत्री मा. ना. ईश्वर खंडरे , के एल ई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजपचे खासदार प्रभाकर कोरे , अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचे अध्यक्ष  शिवापनूर, आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यामध्ये विरक्त मठ संस्थान आणि पंचाचार्य मठ संस्थांचे सुमारे १२०० शिवाचार्य , मठाधिपती यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित होते.



समाजाच्या अस्मितेची जपणूक, धार्मिक ओळख दृढ करणे आणि जनगणनेतील धर्माच्या कॉलममध्ये ‘वीरशैव-लिंगायत’ असा जनगणनेत सात नंबरच्या कॉलम मध्ये स्वतंत्र उल्लेख व्हावा या प्रमुख निर्णयासाठी हा ऐतिहासिक मेळावा भरविण्यात आला. या महामेळाव्यात अनेक मान्यवर संत-महंतांनी स्पष्ट केले की, “वीरशैव-लिंगायत समाजाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन केंद्र व राज्य शासनाने जनगणनेत स्वतंत्र धर्म नोंदीसाठी सहकार्य करावे.” 



प्रा. मनोहरजी धोंडे सरांची ठाम व स्पष्ट भूमिका मेळाव्यातून पुढे आली.या वेळी महाराष्ट्रातून विशेष निमंत्रणावर आलेले शिवा संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष व सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून समाजाच्या भावना थेट मांडल्या.त्यांनी सांगितले की,
“जनगणनेतील सात नंबरचा कॉलम मध्ये स्वतंत्र ‘वीरशैव-लिंगायत’ नोंद ही फक्त कर्नाटकापुरती मागणी नाही. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ही मागणी आता अखिल भारतीय पातळीवरची ठरते. शिवा संघटना सुरुवातीपासून या प्रश्नावर अभ्यासपूर्वक भूमिका मांडत आहे. समाजाच्या हितासाठी हा संघर्ष शेवटपर्यंत लढवला जाईल.  

आम्ही सत्य, न्याय आणि अस्मितेसाठी कोणत्याही स्तरावर झुंज देण्यास तयार आहोत, आम्ही हिंदू असलो तरी आमची संख्या देशाला आणि जगाला कळली पाहिजे, वीरशैव लिंगायत समाजाची संख्या प्रचंड असुनही वीरशैव लिंगायत समाजाची साधा उल्लेखही कोठे होत नाही संख्या माहिती नसल्याने शासनही समाजाकडे पाहत नाही आजच्या काळात संख्येला महत्व आहे त्यामुळे, यावेळी जनगणनेतील सात नंबरच्या कॉलम मध्ये वीरशैव लिंगायत धर्म अशी नोंद करणार असुन जातीच्या कॉलम मध्ये जी जात असेल त्याला लिंगायत जोडून जसे लिंगायत वाणी, लिंगायत माळी, लिंगायत तेली, या प्रमाणे लिंगायत लावुन पुढे आपली जात उपजातीची नोंद करणार असल्याचे सांगितले.
प्रा. मनोहरजी धोंडे सरांची भूमिका ऐकल्यानंतर उपस्थित अनेक राज्यांतील समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले. त्यांच्या भूमिकेबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्रास इतर राज्यातील जनतेत मोठ्या प्रमाणावर सकारात्मक चर्चा सुरू आहे..



अनेक राज्यांतील सामान्य समाजबांधवांचे म्हणणे असे आहे की “धोंडे सरांनी महाराष्ट्रात जसा कायदेशीर व न्याय्य लढा ओबीसी आरक्षणासाठी दिला, तसा ठाम व अभ्यासपूर्ण लढा आता वीरशैव लिंगायत समाजाच्या जनगणनेतील ओळखीकरिता सुरू केला आहे, यामुळे समाजाचा राज्य व देशपातळीवर फायदा व ओळख होणार आहे.त्यांचे भाषण ऐकताना समाजमनाला भिडणारे विचार जाणवले. ही भूमिका आमच्या अंतःकरणाला भिडली आहे.समाजाची खरी ओळख टिकवण्यासाठी ज्या धाडसी आणि तडफदार नेतृत्वाची गरज आहे, ते प्रा. मनोहर धोंडे सरांकडे आहे.” 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top