नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी मराठा समाजाचे उमेदवार उभे केले असते तर इतर सर्वांचा सुपडासाफ झाला असता.

मी मराठा समाजाचा सच्चा सेवक आहे. मराठा समाज कोणाच्याही दावणीला बांधणार नाही. समाज मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही, असा खुलासा मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीत उतरणे इतर पक्षांना महागात पडले असते असा पुनरुच्चार त्यांनी केला.
