नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

*शनिवारपासून खानाव येथे ‘आमदार चषक’ प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट स्पर्धा*

पनवेल (प्रतिनिधी): तालुका भाजपचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार चषक’ प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन खानाव येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ०८ ते मंगळवार ११ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे.



स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, तसेच शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या संघाला ०१ लाख रुपये व भव्य चषक, उपविजेत्यास ५० हजार रुपये, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी २५ हजार रुपये, मालिकावीरास दुचाकी मोटारसायकल, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व क्षेत्ररक्षकाला आणि प्रेक्षकांसाठी आकर्षक बक्षिसे असणार आहेत. या स्पर्धेचा क्रीडारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धा आयोजक ऍड. शशिकांत दिसले यांनी केले आहे.





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top