पनवेल : 4k समाचार दि. 27
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. शहरातील तब्बल ६१ गणेशघाटांवर मंडप, वीजपुरवठा तसेच पुष्पवृष्टीची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेशभक्तांना प्रसाद म्हणून श्रीफळ देण्यात येणार असून, विसर्जनाच्या काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेचे सर्व विभाग युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले.

पनवेलकरांसाठी सुरक्षित व सुरळीत गणेश विसर्जन व्हावे यासाठी पालिकेने आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
