4k समाचार दि. 27
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील विविध गावांतून तब्बल 1200 गाड्या अंतरवेलीच्या दिशेने रवाना झाल्या असून, हजारो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

समाज बांधवांनी वर्गणी करून गाड्यांची तसेच पंधरा दिवस पुरेल अशी जेवणाची सोय केली आहे. या उत्स्फूर्त सहभागामुळे जरांगे यांच्या आंदोलनाला भक्कम पाठबळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठा समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याला मिळालेला मोठा प्रतिसाद हा समाजातील ऐक्याचा आणि जिद्दीचा प्रत्यय देणारा असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
