4k समाचार दि. 28
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. यासाठी त्यांनी हैद्राबाद गॅझेट, मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी निरर्थक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीने याबाबत अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. या तिन्ही गॅझेटमध्ये तत्कालीन समाजातील विविध जातींची आकडेवारी असली तरी वैयक्तिक पातळीवरील माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ गॅझेटच्या आधारावर सरसकट आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
