4k समाचार दि. 28
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सरकारवर दबाव टाकणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता रणनीतीत बदल करत हे आंदोलन राज्यभर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 29 ऑगस्टपासून सात टप्प्यांत संपूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा उभारला जाणार आहे. आतापर्यंत मुंबईपुरते मर्यादित असलेले हे आंदोलन गावागावातून सुरू होऊन राज्यपातळीवर विस्तारले जाईल.

सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे जरांगे यांनी हा कठोर पवित्रा घेतल्याचे सांगितले जात आहे. एकाचवेळी राज्यभरातून दबाव निर्माण करून आरक्षणाच्या मागणीसाठी निर्णायक टप्पा गाठण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.
