4k समाचार दि. 5
५ दिवसांपूर्वी त्यांच्या पाळीव जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या नखाने त्यांना ओरखडा लागला. त्या कुत्र्याचे नियमित रेबीज लसीकरण होत असल्यामुळे आणि कुत्र्याने चावलेले नाही, फक्त नख लागले आहे, असे समजून वनराजभाईंनी दुर्लक्ष केले. पण त्यांना रेबीज झाला.

त्यानंतर ते अहमदाबादमधील अतिशय महागड्या केडी हॉस्पिटलमध्ये ५ दिवस दाखल होते. पण जसे मी म्हटले तसे रेबीजवर कोणताही उपचार नाही. त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आणि त्यांचे दु:खद निधन झाले.
शेवटच्या क्षणी त्यांना बेडला बांधून ठेवावे लागले कारण रेबीजचा विषाणू माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवतो आणि त्याला वेडा बनवतो.

त्यामुळे आता जर तुम्हाला कुठल्याही कुत्र्याच्या नखानेसुद्धा ओरखडा लागला तरी रेबीजची लस नक्की घ्या.
आणि जर कुणाच्या पाळीव कुत्र्याने चावले किंवा नख लागले आणि त्या कुत्र्याचा मालक म्हणाला की त्याला रेबीजची लस दिलेली आहे तरीसुद्धा तुम्ही इंजेक्शन नक्की घ्या
