नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

भेंडखळ येथे आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तर्फे विविध उपक्रमाचे आयोजन.




4k समाचार
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात नवरात्रौत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो.उरण तालुक्यातील भेंडखळ गावात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तर्फे नवरात्रौत्सव साजरा होत असून नवरात्रौत्सव साजरा करण्याचे हे यंदाचे २२ वे वर्ष आहे. २००४ पासून सदर नवरात्रौत्सव अखंडितपणे भेंडखळ मध्ये साजरा होत आहे. या नवरात्रौत्सव मध्ये अनेक विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या मंडळाच्या देवीचे भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शन घेऊन विविध कार्यक्रमाचा लाभ सुद्धा घेतला आहे. नवरात्रौत्सव दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघांचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी या मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. मंडळानी आयोजित केलेल्या विविध उपक्रमाचे, कार्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कौतुक केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा, विद्यार्थ्यांचा यावेळी खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांचाही खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ चांगले कार्य करीत असून विविध उपक्रम राबवून समाजात जनजागृती करीत आहे. या मंडळाचे कार्य कौतुस्कापद, उल्लेखनीय आहे. अशीच जनतेची सेवा आपल्या हातून घडो असे शुभेच्छा देत खासदार बारणे यांनी मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.नवरात्रौत्सव दरम्यान सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष अतुल भगत, अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष राकेश भगत, सचिव यतिश भगत, खजिनदार जय भगत, सर्व सल्लागार,सर्व कार्यकारिणी सदस्य, व्यवस्थापकीय सर्व सदस्य, महाप्रसाद समितीचे सर्व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top