4k समाचार दि. 23
महाराष्ट्र – यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने परतीच्या प्रवासावर असलेला मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड व धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २८ सप्टेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहील, तर परतीचा मान्सून ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान उशिराने सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
