4k समाचार दि. 23
नवी मुंबई – पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी केलेल्या तपासणीत शहरात अनेक शाळा परवानगीशिवाय सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयुक्तांच्या सूचनेनुसार संबंधित शाळांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये काळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल, अर्कम इंग्लिश स्कूल, ओसीन ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल आणि द वेस्ट हिल हाय इंटरनॅशनल स्कूल या शाळांचा समावेश आहे. आयुक्तांच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, अन्य अनधिकृत शाळांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
