4k समाचार दि. 23
नवी मुंबई – पनवेल बस स्थानक परिसरात ६५ वर्षीय वृद्धाची फसवणूक करून त्याच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची, अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चंद्रशेखर सावंत यांनी कळंबोलीला जाण्यासाठी भाड्याने इको गाडी ठरवली होती. दरम्यान, गाडीचालकाने सावंत यांना चहातून गुंगीचे औषध देऊन त्यांची चैन चोरली.
या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.
