4k समाचार दि. 23
२२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटी स्लॅबनुसार देशभरात आता फक्त ५% आणि १८% असे दोनच कर टप्पे राहणार आहेत. यामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या असल्या तरी मद्यप्रेमींना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

दारूवर अद्याप जीएसटी लागू नसून ती राज्य सरकारांच्या आबकारी कराखालीच येते. मात्र, सरकारने आणलेल्या ४०% विशेष करश्रेणीत तंबाखू, सिगारेटसह आलिशान वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मद्यावरील कर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या तरी दारूच्या किमतीत कोणताही फरक नाही, पण आगामी काळात दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
