4k समाचार दि. 23
मराठवाडा – रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव, बीड आणि जालना जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत केले आहे. परंडा, पाटोदा, शिरूर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत असताना, काही ठिकाणी अतिवृष्टीचा तडाखा बसत आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आतापर्यंत मुसळधार पावसामुळे राज्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
