4 k सामाचार दि. 23
सोलापूर – पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात जाण्याची घोषणा केली आहे.

सोमवारी शिंदे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावून पाटील यांनी यापुढील निवडणुका शिंदे गटासोबत लढवण्याचा निर्णय स्पष्ट केला. त्यांच्या या भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.
