नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार


पनवेल / प्रतिनिधी(4kNews)
नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या सार्वत्रिक विधासभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळेस नेत्रदिपक विजय मिळवला आहे.विजयी चौकार लगावलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्र बिंदू असणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे या चारही विजयात अतुलनीय नियोजन कौशल्य आहे.

या पार्श्वभूमीवर क्रियाशील प्रेस क्लबच्या वतीने, भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी रामशेठ ठाकूर यांचा शानदार पद्धतीने पण लक्षवेधी अनोखा सत्कार बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी केला.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सय्यद अकबर यांच्या राजकारणी आणि पत्रकार अशा दुहेरी भूमिकेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन केले. एकीकडे सय्यद अकबर हे अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मुस्लिम मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत होते, तर दुसरीकडे सय्यद अकबर यांच्यातील पत्रकार,परखड लेखणीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ही मुसलमान मतदारांची शत्रू नसून त्यांची मित्र,राखण करती आणि उत्कर्ष करणारी आहे! ही वस्तुस्थिती मांडली.यावेळी सय्यद अकबर यांच्या समवेत क्रियाशील प्रेस क्लबचे सदस्य उपस्थित होते.


सय्यद अकबर यांनी यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवास्थानी फटाक्यांची आतषबाजी केली.ही आतषबाजी पाहण्यासाठी दस्तुर खुद्द रामशेठ ठाकूर स्वतः बंगल्याच्या बाहेर आले होते. रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करताना त्यांना हुशारीने प्रतीक असणारी पुणेरी पगडी प्रदान करण्यात आली. मायेची उबदार शाल पांघरून रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य साधणाऱ्या चित्त्याची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


सय्यद अकबर यांनी 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातील तमाम मुस्लिम बांधवांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराशी संवाद साधला. या प्रचारात त्यांनी भारतीय जनता पार्टीने मुसलमान बांधवांसाठी केलेल्या अनेक योजनांची माहिती प्रत्येक मतदाराला सांगितली. तसेच मुस्लिम बांधवानकरता लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर देत असलेल्या भरघोस मदतीचे बद्दल त्यांना अवगत केले. त्यांनी निवडणुका जाहीर झाल्यापासून गेल्या दोन महिन्यात अक्षरशः पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे मतदारसंघ पिंजून काढला. विशेष उल्लेखनीय म्हणजे सय्यद अकबर यांनी या निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने करता हजारो मुसलमान बहिणींची नोंदणी करून थेट त्यांच्या खात्यात लाभ मिळवून दिला.सय्यद अकबर यांनी विरोधकांनी केलेल्या मुसलमान बांधवांच्या लांगुलचांलनाच्या खोट्या नरेटिव विरोधात प्रामाणिक आणि सचोटीने प्रचार करत विरोधकांच्या धार्मिक विभाजनाच्या खेळीला सुरुंग लावला. लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या पदरात आलेले अपयशाकडून सय्यद अकबर यांनी सबख घेत विधानसभेला खंबीरपणे मुसलमान मतदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे वळवला.त्यांच्या या खडतर परिश्रमाची लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रशंसा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top