पनवेल दि २६ /प्रतिनिधी 4kNews
पनवेल महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ०२ मधील काही भागात सांड पाणी वाहून जाण्यासाठी गटार नसल्याने येथील नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे .

बारमाही या सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने मच्छर,डास, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे . यामुळे या भागात गटार बांधावे अशी मागणी जागृती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे ,सरचिटणीस कुवर पाटील , उपाध्यक्ष संदेश पाटील यांनी पनवेल महानगर पालिका आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे केली आहे .

पडघे गावातील सुनील रंगनाथ भोईर ,सार्थक सुनील भोईर ,नामदेव कान्हा भोईर ,अशोक जनार्दन भोईर ,राहुल लक्ष्मण भोईर यांच्या घरापासून मुख्य नाल्याला जोडणारे गटार बांधावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे .
