उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषद उरण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या माध्यमातून उरण मध्ये पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उरण नगरपरिषदेच्या कार्यालयात विविध शाळा कॉलेजमधील विद्यार्थी,नागरिक, सफाई कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत पर्यावरण संरक्षण व प्लास्टिकचे वापर टाळणे या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी सर्वप्रथम उरण नगरपरिषदेचे अधिकारी सुरेश पोस्तांडेल यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक समीर जाधव यांनी

उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात त्यांनी पर्यावरण दिन का साजरा केला जातो? नागरिकांचे जबाबदाऱ्या कर्तव्य काय आहेत? याविषयी मार्गदर्शन केले. नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू वापरू नयेत पर्यावरणाचे संरक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले.तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी डॉ. विक्रांत भालेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्याने मानवी जीवनावर कसा घातक परिणाम होतो हे उदाहरणासह सांगून प्लास्टिक वापरण्याचे टाळावे,प्रशासनाच्या पर्यावरण उपक्रमात विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे, प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संरक्षणात महत्त्वाचे भूमिका निभवावे असे आवाहन करत त्यांनी उपस्थित सर्वांना प्लास्टिक न वापरण्याचे व पर्यावरणाचे संरक्षण करण्याची शपथ दिली. याप्रसंगी उपस्थितांना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उरण नगरपरिषद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

जनजागृतीचा एक भाग म्हणून अलिबाग मधील मिरर थेटर्स ग्रुपच्या कलाकाराने प्लास्टिक वापरू नका या विषयावर सुंदर असे पथनाट्य सादर करून रसिक प्रेषकांचे मने जिंकले. त्यानंतर उरण नगरपरिषद कार्यालय मधून उरण शहरात जनजागृती करण्याच्या उद्देशाने रॅली काढण्यात आली. झाडे लावा झाडे जगवा प्लास्टिक टाळा पर्यावरणाचे संरक्षण करा अशा घोषणा रॅली दरम्यान देण्यात आले. उरण मध्ये विविध ठिकाणी साफसफाई सुद्धा करण्यात आली.

अशा प्रकारे विविध उपक्रमांचे, कार्यक्रमांचे आयोजन करून उरण नगरपरिषद उरण व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून उरण मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. व पर्यावरण संरक्षण विषयक मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. या विविध उपक्रमास, कार्यक्रमास विद्यार्थी, नागरिक,पालक, ग्रामस्थ, सफाई कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शेवटी उरण नगर परिषदच्या आवारात रॅली आणण्यात आली. व कार्यक्रमाचा समारोप झाला. या प्रसंगी समीर जाधव – मुख्याधिकारी उरण नगर परिषद, डॉ. विक्रांत भालेराव – उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, संतोष मोहरे – क्षेत्र अधिकारी, सुरेश पोसतांडेल लेखापाल, गोविंदा कांबळे- लेखापरीक्षक,हरेश तेजी – स्वच्छता निरीक्षक, निखिल ढोरे नगर अभियंता, स्नेहा वंजारी पाणी पुरवठा अभियंता, अंजुम मुलानी विद्युत अभियंता, भानुदास यादव सहाय्यक कर निरीक्षक, संजय डापसे कर निरीक्षक आदी उरण नगर परिषदेचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
