नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

प्रितम दादा एकटा लढलापराभूत झाला तरी,संपूर्ण ताकदीने नडला


     उरण 190 विधानसभेत शेकाप आघाडीची  2019 मध्ये 60,000 + मते असताना, चार महिन्यातच जोरदार उरण मध्ये मुसंडी मारून एकट्या शेतकरी कामगार पक्षाचा 88,000 चा आकडा प्रितमदादांनी पार केला.
    प्रितमदादांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सभा घेतल्या. शिवसेनेने मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे यांची सभा घेतली. स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता  कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना शेकाप नेते श्री. जे एम म्हात्रे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली प्रितमदादांच्या सोबतीने एकटाच लढला.
  

शेकाप मधील काही नेते सुद्धा दादांच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीच्या छत्रछायेखाली दादांच्या विरोधात काम करत होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व मोठे पक्ष एकत्र होते. प्रितमदादांना भाजपनेच उभे केले आहे मते खाण्यासाठी अशा प्रकारचा प्रचार केला गेला.परंतु आता निकाल नंतर तिसऱ्या क्रमांकावर गेलेल्या शिवसेनेच्या मतांमुळे नक्की कोणी कोणाला उभे केले हे आता जग जाहीर झाले आहे.


  दादांच्या सोबत दुसऱ्या फळीतील तरुणांची फौज रस्त्यावर उतरून दादांची प्रचार यंत्रणा हातात घेऊन गावोगावी शिट्टी ही निशाणी पोहोचण्यात मग्न होती. वातावरण विरोधी असताना सुद्धा दादांनी लढण्याचे ठरवले आणि निसटता पराभव त्यांना पत्करावा लागला. हार न मानता पुन्हा दुसऱ्याच दिवशी आपल्यावर ज्या 88,000 मतदारांनी विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी त्याच सर्व तरुण कार्यकर्त्यांची फौज घेऊन दादांनी पुन्हा जोमाने काम करण्याचे ठरवून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
           यावरून भविष्यात प्रितम जनार्दन म्हात्रे हे उरण विधानसभा क्षेत्रात भविष्यात येणाऱ्या इतर निवडणुकीत इतर पक्षांना त्यांची जागा दाखवणार असे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top