नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे प्रकल्पग्रस्त शेतकरी नामदेव गोंधळी यांचे पनवेलकरांना आवाहन

पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः पनवेल विधानसभा मतदार संघाचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन प्रकल्प्रस्त शेतकरी व न्यायालयीन लढा देण्यात प्रसिद्ध असलेले असे नामदेव गोंधळी यांनी पनवेलकरांना केले आहे.

जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून नामदेव गोंधळी हे शेतकरी शासनाविरोधात लढा देत आहेत व या लढ्याला आता यश मिळू लागले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी या संदर्भात पनवेल तालुक्यासह अलिबाग येथे सुद्धा 11 पत्रकार परिषद घेवून शासनाविरोधात आवाज उठविला आहे. या लढ्यामध्ये त्यांना प्रामुख्याने शेकाप नेते बाळाराम पाटील व जी.आर.पाटील यांची साथ व मार्गदर्शन लाभले आहे.

आज नामदेव गोंधळी यांच्या लढ्याला यश येत असले तरी त्यांना साथ देणारे बाळाराम पाटील यांना ते विसरले नसून त्यांचा प्रचार ते तनमनधनाने करीत आहेत व या निवडणुकीत शेतकरी बांधवांनी बाळाराम पाटील यांनाच मतदान करावे, शिट्टी समोरील बटण दाबावे असे आवाहन आपली 11 वी पत्रकार परिषदेत घेताना पत्रकार बांधवांच्या माध्यमातून केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top