कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन योजना निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या राज्यातील 21 शिवभोजन केंद्रे निधीअभावी अडचणीत आली आहेत.

सामान्य लोकांसाठी उपयुक्त ठरलेली ही योजना बंद होणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. योजनेच्च्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
