संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया अखेर तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

पोलिस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ही प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात 50 हजार नागरिकांना घेऊन माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले आहे.
