पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नविन पनवेल शहर शाखेच्या वतीने शहर प्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वात दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 साजरी करण्यात आली. महिलांसाठी हळदीकुंकू आणि होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर,युवासेना जिल्हा प्रमुख पराग मोहिते,शिवसेना महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, महानगर संघटक दिपक घरत, शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव ,अजय गोयाजी ,उपजिल्हा संघटिका रेवती सकपकाल

, उपशहर मालती पिंगळा , विभाग प्रमुख किरण सोनावणे, बिपीन झुरे, शाखा प्रमुख संदेश बन्ने, मृण्मय काणे, गोविंद जोग , संजय भोसले, प्रवीन चोनकर, विकास पोवळे, ओमकार धावडे , वैशाली थळी, तनुजा झुरे, आदि मान्यवर उपस्थित होते.
