पनवेल तालुक्यातील गव्हाण वडघर जि.परिषद विभागातील सर्व पदाधिकारी यांची संघटना बांधणीसाठी महत्वाची बैठक गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता त्रिवेणी धाम मंदिर गवळी वाडा सेक्टर ३ करंजाडे पनवेल येथे संपन्न झाली.
प्रथम जिल्हा प्रमुख श्री अतुलशेठ भगत साहेब दीप प्रज्वलित करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून सभा सुरू केली. शिवसेनेचे उप मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत संघटनात्मक बांधणी करिता विशेष भर दिला. तसेच केन्द्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या ज्या लोकोपयोगी योजना आहेत या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड श्री अतुलशेठ भगत यांनी सर्व पदाधिकारी यांना सांगितल्या व तशा सूचना देण्यात आल्या. पनवेल तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करावी. व शिवसेनेचे विचार घराघरात पोहचवावेत असे मत युवा सेना राष्ट्रीय सचिव श्री रुपेशदादा पाटील यांनी व्यक्त केले. तसेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील त्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागावे असे मत शिवसेना उप जिल्हा प्रमुख श्री विनोद साबळे यांनी व्यक्त केले.

या बैठकीला रायगड जिल्हा प्रमुख श्री अतुलशेठ भगत, युवा सेना राष्ट्रीय सचिव श्री रुपेशदादा पाटील , उपजिल्हा प्रमुख श्री विनोद साबळे, पनवेल तालुका संपर्क प्रमुख श्री बाळाशेठ नाईक, पनवेल तालुका प्रमुख श्री रघुनाथशेठ पाटील, महिला रायगड जिल्हा प्रमुख सौ. मेघाताई दमडे, उरण विधानसभा संघटक श्री मनोज घरत, सौ. सुप्रिया साळुंखे, पनवेल महिला तालुका प्रमुख प्रगती ठाकूर, युवा सेना उप जिल्हा प्रमुख प्रितम सुर्वे, महिला उप तालुका प्रमुख पुर्णा पाटील, सोशल मीडिया प्रमुख उरण विधानसभा सागर रोकडे, पनवेल शहर प्रमुख बांधकाम सेना अंजली मानापुरे, संजय घुले बांधकाम सेना उलवे व
शहर प्रमुख सोनल घरत, करंजाडे वडघर शहर प्रमुख श्री हितेश नाईक, वैद्यकीय मदत कक्षाचे राजाभाऊ नलावडे, सुधीर पाटील, संजय आंग्रे, शुभम धारेराव, प्रकाश पालकर, श्री नाथाभाई भरवाड वडघर करंजाडे विभाग प्रमुख, श्री बाळासाहेब आवारी करंजाडे पंचायत समिती विभाग प्रमुख, वसंत सोनावणे, उप शहर प्रमुख करंजाडे, श्री मिरेंद्र शहारे, गौरव गायकवाड, स्वप्नील मोरे, प्रीती शर्मा, अंजू सिंग मेहबूब शेख विरेंद्र सिंग, वंश फडके, अविनाश साबळे या सभेचे सुत्रसंचालन शिवसेना उप तालुका प्रमुख श्री चंद्रकांत गुजर यांनी केले. सर्वांना अल्पोपहार देऊन सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .
