नवीन बातम्या
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*


पनवेल:
राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने न्याय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिरते लोकन्यायालय आणि कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 24 मार्च रोजी नेरे येथे फिरते लोकन्यायालय, तर 25 मार्च रोजी ग्रामपंचायत करंजाडे येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर पार पडले.



या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ पनवेल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारातून सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत, फिरत्या लोकन्यायालयाला ग्रीन सिग्नल देऊन करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये निवृत्त न्यायाधीश माननीय श्री. उपाध्ये यांची फिरत्या लोकन्यायालयासाठी विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अमूल्य अनुभवाच्या जोरावर अनेक प्रकरणे निकाली लागली तसेच नागरिकांना न्याय व कायद्याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले.



राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने न्याय गावागावांपर्यंत
राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात न्यायालयीन प्रक्रियांबद्दल जनजागृती, तडजोडयोग्य प्रकरणांची सोडवणूक आणि कायद्याविषयी मार्गदर्शन यावर भर देण्यात आला. *माननीय न्यायाधीश उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली फिरत्या लोकन्यायालयाने अनेक प्रकरणे निकाली काढली, तर कायदेविषयक शिबिराद्वारे नागरिकांना कायद्याच्या महत्त्वाच्या बाबी समजावून सांगण्यात आल्या.



या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेरे ग्रामपंचायत आणि करंजाडे ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवता आला आणि शेकडो नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळू शकला.
याशिवाय, ॲड. इंद्रजीत भोसले, ॲड. स्वाती सोनवणे, ॲड. सुयश कामेरकर, ॲड. विकी दुसिंग, ॲड. मनीषा गायकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच वरिष्ठ लिपिक श्री. हेमंत आंबेतकर आणि विधी स्वयंसेवक – शैलेश कोंडसकर यांनीही या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.



राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या सहकार्यामुळे न्याय गावागावांपर्यंत पोहोचला असून, कायदेशीर प्रक्रियांविषयीची जनजागृती प्रभावीपणे झाली आहे. माननीय न्यायाधीश उपाध्ये यांचे मार्गदर्शन आणि संपूर्ण न्यायिक, विधी व स्वयंसेवी टीमच्या प्रयत्नांमुळेच हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top