नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

माळरान ते हिरवाई; निर्जीव वन जमिनीला केले हरित समृद्ध

पनवेल (प्रतिनिधी) पडीक असलेल्या निर्जीव वनजमिनीला दीपक फर्टिलायझर्सने हरित करत समृद्ध केल्याने म्हाळुंगी येथील वनजमीन माळरान ते हिरवाई अशा प्रवासाने पुनर्जीवित झाली.



तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्सच्या प्रकल्पापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेली ही जमीन निर्जीव अवस्थेत होती. आणि त्यामुळे निसर्गाची कुजबुज ओसरल्यासारखी वाटत होती, एक उजाड माळरान मागे सोडले होते, पण आशा हरपली नव्हती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार दीपक फर्टिलायझर्सने या १७.०६ एकर जागेत पुन्हा वृक्षांना जीवदान देण्याचे आव्हान स्वीकारले. आणि त्या अनुषंगाने  गेल्या तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे एकेकाळी निर्जीव झालेल्या वनक्षेत्राचे रूपांतर हरित परिसंस्थेत झाले आहे. एकेकाळी उजाड आणि ओसाड असलेला हा भाग आता जिवंत अधिवास, वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान म्हणून उभा राहिला आहे.



  दीपक फर्टिलायझर्सचे अध्यक्ष (मॅन्युफॅक्चरिंग) मुकुल अग्रवाल यांनी संदर्भात सांगितले कि, आमचे वन विकास प्रकल्प हे पर्यावरण संवर्धन आणिसामुदायिक कल्याणासाठी आमच्या अढळ बांधिलकीचे प्रतिबिंब आहेत. आमचा असा विश्वास आहे की, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, जैवविविधता सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडविण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत.

दीपक फर्टिलायझर्सने या भागात एकूण २ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक करून विविध प्रकारच्या औषधी, फळेदेणारी आणि देशी प्रजातींसह १३,४२० झाडे लावली आहेत.
कल्याण वनपरिक्षेत्रांतर्गत पिसावली गावाजवळील ५० एकर जागेत धावडी येथे दीपक फर्टिलायझर्सचा पहिला वन विकास उपक्रम सात वर्षांत



राबविण्यात आला. १ कोटी ८२  लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पात २२ हजार २०० वृक्षांची यशस्वी लागवड  करण्यात आली.  हे उपक्रम नीती आयोगाने नमूद केल्याप्रमाणे ३३ टक्के वन आणि वृक्षाच्छादन साध्य करण्याच्या भारताच्या मोठ्या उद्दिष्टाशी सुसंगत आहेत.  दीपक फर्टिलायझर्स भारताच्या पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि शाश्वततेच्या उद्दिष्टांमध्ये योगदान देण्याच्या आपल्या ध्येयावर ठाम असून जबाबदार कॉर्पोरेट नागरिकत्वासाठी एक बेंचमार्क स्थापित करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top