पनवेल (प्रतिनिधी) खाडी पाण्याच्या उधाणाने बांध तुटून नुकसान झालेल्या धेरंड येथील घरांचे सर्वेक्षण होऊन अद्यापही भरपाई न मिळाल्याने सदरचे घरमालक भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

अलिबाग तालुक्यातील शहापूर विभागातील धेरंड गावात १४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उधाणाच्या पाण्याने खाडीचे बांध तुटले आणि या पाण्याचा प्रवाह गोविंद कृष्णा पाटील तसेच मारुती कृष्णा पाटील, जनार्दन दया पाटील, मच्छिद्र नारायण पाटील, गणेश सुधाकर पाटील, जालिंदर बबन पाटील, चंद्रकांत पुंडलिक पाटील यांच्या घरांचा पाया खचला आणि त्या अनुषंगाने घरांच्या भितींना मोठे तडे जाऊन मोठे नुकसान झाले.

या संदर्भात १६ डिसेंबरला शहापूर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी व तलाठी यांनी सर्वेक्षण केले होते. मात्र अद्यापही या घरांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली असून पाठपुरावा केला जात असला तरी हि घरे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत अडकली आहेत. या संदर्भात नाय मिळावा, अशी मागणी गोविंद पाटील व इतर ग्रामस्थांकडून होत आहे.
