नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

शनिवारी ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ; पहिल्या एआय ‘आज्जीबाई जोरात’ महाबालनाट्याची विद्यार्थ्यांना पर्वणी

पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या शनिवारी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेले ’आज्जीबाई जोरात’ हे पहिले एआय महाबालनाट्य सादर होणार आहे.


  या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ यांची उपस्थिती लाभणार असून सोहळ्याचे उदघाटन लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.


 सर्वसाधारणपणे भावना व्यक्त करण्यासाठी संवाद साधणे आवश्यक असते. वक्तृत्व जर प्रभावी असेल तर ते परिणामकारक ठरते. शिवाय ती एक ताकद असते, जी विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यासाठी उपयुक्त ठरते. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यवस्थितपणे मांडता याव्यात व त्यांची वक्तृत्व शैली विकसित व्हावी या उद्देशाने कोशिश फाऊंडेशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनकडून अनेक सेवाभावी उपक्रम राबविले जातात. पनवेलमधील पर्यावरणीय प्रगतीशील परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि सकारात्मक वातावरणीय बदलासाठी कोशिश फाऊंडेशनच्या माध्यमातून ऑक्सि पार्क साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर सातत्याने वृक्षारोपण करून पर्यावरणाचे जतन व संवर्धन केले जाते. याशिवाय वर्षभर निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा, घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचा समावेश असतो. गायकांना व्यासपीठ मिळावे याकरिता पनवेल शहरातील प्रसिद्ध वडाळे तलाव या ठिकाणी सूर पनवेलचा कार्यक्रमांतर्गत मैफिल भरवली जाते. भविष्यातही कोशिश फाऊंडेशनचे प्रकल्प, उपक्रम नियोजित आहेत.   वक्तृत्व स्पर्धेत १६ विद्यालयातील १५ हजार ८९६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील बक्षिसपात्र विजेत्यांना लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिकांसाठी ७५०२१००१०० या क्रमांकावर संपर्क साधावा आणि या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top